Dombivli fast...
आज सवयी प्रमाणे डोंबिवली प्लॅटफॉर्म ५ वर धावलो , फ़ास्ट ट्रेन येतच होती . धावत धावत कसाबसा लास्ट 'फर्स्ट क्लास' पर्यंत पोचलो पण पाहतो तर काय नेहमी प्रमाणे पूर्ण डब्याबाहेर माणसांचा फुलोरा होता , आत जाणं सोडा बाहेर गेट वर उभा राहणं पण अशक्य होतं … मनात म्हटला "चला साहेब स्लो ने…" आणि लगेच ब्रिज साठी पुढे निघालो . तितक्यात एक 'फर्स्ट क्लास' मध्ये घुसण्याचा प्रयत्न करणारा माणूस धावत 'सेकंड क्लास ' मध्ये घुसू लागला आणि आतही गेला … तसा 'सेकंड क्लास ' पण भरलेलाच होता , अचानक म्हटलं जाऊया का? ट्रेन कोणत्याही क्षणी सुटायची वेळ होती मग म्हटला प्रयत्न करू असं म्हणून डब्याकडे धावेपर्यंत दुसरा एक माणूस येउन चढला , मग वाटलं आता नो चान्स … :-(

पण मी चढायचा प्रयत्न केलाच आणि मी त्या माणसांच्या गराड्यातून हळूच आत जायचा प्रयत्न करणार इतक्यात कोणीतरी माझा हात धरला , मी ओरडणार इतक्यात कोणीतरी पाठून धक्का पण दिला आणि हात धरणार्याने मला आत खेचला. मी डायरेक्ट ' Bowling ' मधे लावलेल्या बाटलीसारखा आत मध्ये इतर लावलेल्या बाटल्यांच्या ( माणसांच्या ) समूहात उभा राहिलो , आता ट्रेन सुटलेली त्याक्षणी हूश केला आणि " थँक़ यु " इतकच मुखातून बाहेर आलं , आता माझा हात देखील सोडलेला होता आणि मागून धक्का पण नव्हता . त्यांना थँक़ यु म्हणायला मागे -पुढे पाहिलं तर बाटल्या पुन्हा काहीच न झाल्या सारख्या सेट मध्ये उभ्या होत्या , खरं तर त्यांच्यासाठी खरच काही झाला नव्हता . काही झाला असेल तर ते फक्त माझ्यासाठीच . त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता सहज झालेली ती कृती होती . त्यांनी सहज केलेल्या कृतीचा माझ्यावर नक्कीच चांगला परिणाम झाला.
सेन्ट्रल सेकंड क्लास रॉक्सं … :-)
-सागा
No comments:
Post a Comment